वेगाव येथील तुकाराम वैद्य यांच्या घराला आग लागून त्यांचे रोज उपयोगीचे साहित्य जाळून खाक झाल्यची घटना दि ०५/०१/२०२३ रोजी ११.०० च्या सुमारास घडली.
सविस्तर वृत्त असे की तुकाराम यांच्या घरामध्ये शॉर्टसर्किट मुळे आग लागली यामध्ये घरातील साहित्य जळून खाक झाले.या घटनेत त्यांचे अंदाजे १ लाख रुपयाचे नुकसान झाले असून त्यांच्या घरातील रेफ्रिजेटर तसेच इतर रोज उपयोगातील साहित्य मोठ्या प्रमाणात जाळून खाक झाले आहे.आगीला विझवण्यात गावातील लोकांना यश आले त्यामुळे मोठी हानी होण्याचे टळले.