वणी :- प्रतिनिधी
संजय पिंपळकर हे कामानिमित्त वरोरा येथे जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या बसने जबर धडक दिली. यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना सोमवार दि. 9 जानेवारीला दुपारी घडली.
मृतक संजय हे जैन ले आऊट परिसरातील निवासी होता. ते आपली दुचाकी क्रमांक MH 29 B 1810 ने वरोरा येथे जात होता. तर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाची बस क्रमांक MH07 C9375 वणी कडे येत होती.
पाटाळा पुलाजवळ नवीनतम बांधकाम सुरू असल्याने वाहतूक एकमार्गी करण्यात आली आहे. या मार्गावरून मोठया प्रमाणात रहदारी सुरु असते. यामध्ये बस चालकाने दुचाकीस्वारास जबर धडक दिल्या मुळे तो जागीच गतप्राण झाला.तसेच या मार्गावर अपघाताची शृंखला सुद्धा वाढली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.