तालुक्यातील सिंधी (महागाव) येथील एका वृद्ध महिलेने आजारपणाला कंटाळून विषारी द्रव प्राशन करीत आत्महत्या केल्याची घटना 6 जानेवारी 2023 रोजी रात्री उघडकीस आली.
मिराबाई रामदास झाडे (65) असे विषारी द्रव प्राशन केलेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे. मृतक महिलेला दम्याचा आजार होता. सध्या कडाक्याची थंडी हूडहुडी चा तडाखा असल्याने आजार चांगलाच बळावला. आजाराचा त्रास असाह्य होत असल्याने वृद्ध महिलेने शुक्रवारी रात्री राहत्या घरी विषारी द्रव्य प्राशन केले. कुटुंबियांना लक्षात येताच मारेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. मीराबाई यांचे पश्चात दोन मुले, सून, नातवंड असा आप्त परिवार आहे.