वाहित तरुणाने गावातील तरुणीला आपल्या प्रेमपाशात ओढले. तिला लग्नाच्या हमी देत तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला. तिच्या गर्भात बाळ असल्याने तिने लग्नाची गळ घातली. “तो मी नव्हेच” या अविर्भावात त्याने नकार देताच त्या बापडीने विषारी द्रव प्राशन केले. प्रेम, शारीरिक संबंध, पोटात बाळ, लग्नास नकार आणि तिची आत्महत्या काळीज हेलवणारी घटना घडली तालुक्यातील कळमना येथे घडली.
सचिन रमेश नवले (30) असे त्या नराधम तरुणाचे नाव आहे. तो कळमना येथील निवासी असून सध्या शिंदोला या गावात वास्तव्यास आहे. त्याचे लग्न झालेले असताना त्याने दोन वर्षपूर्वी कळमना येथील 19 वर्षीय तरुणीला आपल्या प्रेमपाशात ओढले. अनेकवेळा लग्नाच्या आणाभाका घातल्या आणि आपले इस्पित साध्य केले.
त्या तरुणाने अनेक वेळा तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार केले. यामुळे ती गर्भवती राहिली आणि तिने लग्नाचा तगादा लावला. परंतु “तो मी नव्हेच” या अविर्भावात प्रियकर वावरत असल्याने तिने 14 फेब्रुवारीला सायंकाळी 5 वाजताच्या दरम्यान विषारी द्रव प्राशन केले. पारिवारिक मंडळींना ही बाब कळताच तिला चंद्रपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.पाच दिवस तिने मृत्यूशी झुंज दिली, अखेर दि. 19 फेब्रुवारीला दुपारी 12 वाजता तिची प्राणज्योत मालवली. घडलेल्या घटनेने तिचा संपूर्ण परिवार हादरून गेला होता. दुसऱ्या दिवशी त्यांनी थेट शिरपूर पोलीस स्टेशन गाठून रीतसर तक्रार दाखल केली. ठाणेदार गजानन करेवाड यांनी घटनेचे गांभीर्य ओळखत PSI रामेश्वर कांदुरे यांचे कडे तपासाची सूत्रे दिली.
त्या नराधम आरोपीला तातडीने ताब्यात घेत आत्महत्या करण्यास प्रवृत करणे व नवजात बाळांचे मरणास कारणीभूत ठरल्याने आरोपीवर कलम 376, (2) (N).306 भादवी नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. घडलेल्या घटनेने परिसरात चांगलीच खळबळ माजली आहे.