वणी पोलीस स्टेशन अंतर्गत मौजा रासा येथिल दिनांक 14 फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास बैल जोडी चोरी गेल्याची घटना घडली असून सदर बैल जोडी नामे नरेश घुगुल रा. रासा या शेतकऱ्याची असून बैल जोडी लाख्या रंगाची मध्यम बांध्याची एक रंग पटाला धावणारी व शेती उपयोगी बैल जोडी होती असून सदर जोडी हि नेहेमी प्रमाणे शेतातील गोठ्यामध्ये रात्रीला बांधून ठेवायचे. मात्र याची भणक गावातील मुरर्बी चोरट्या व्यक्तीस लागता त्या व्यक्तींनी सदर जोडीची वारंवार रेखी केली असल्याची गावामध्ये चर्चा असून संशेईत दोन्ही व्यक्ती हे अट्टल चोरटे असल्याचे बोलले जात आहे.
यापूर्वी सदर संशेईत व्यक्तींनी गावातली म्हशी, गाई, तसेच गौरक्षण येथीलही अनेक बैल गाई चोरून विकले असावी अशी चर्चा आहे. तसेच अनेकवेळा गावकऱ्यांनी त्यांना रंगेहाथ पकडून बेदम मारहाणही केल्याची लोकांमध्ये चर्चा असून यापूर्वी संशइत चोरट्यांनी गावातील ट्रॅक्टर चे लोखंडी अवजारही चोरी गेले आहें. संशयित आरोपीचे मोबाईल फोन रेकॉर्डिंग संवाद तपासणे अत्यंत गरजेचे असून यापूर्वीही अशा अनेक घटनेमध्ये ह्याच चोरट्यांचा हात सहभागी होता अशी चर्चेनिशी माहिती असून आज रोजीही चोरट्यांच्या शेतात अशीच जनावरे बांधून ठेवल्याची चर्चा आहे. रासा परिसरात शेतातील मिरची चोर, केबल चोर, बॅटरी चोर, कापूस चोर, जनावर चोर अशा चोरीच्या प्रकरणात फार मोठी वाढ झाली असून अशा चोरट्यांना चांगलाच सबक शिकविणे काळाची गरज असल्याचे बोलले जात आहे.
सदर चोरट्यांना पकडणे आणि त्यांना जेरबंद करण्याचे पोलीस प्रशासनापुढे आव्हान असून अशा घटना थांबविण्यासाठी पोलीस विभागाने आपल्या खाकी वर्दीच्या पॉवर चा दमदार वापर करावा आणि गावातीली चोरट्यांचे मुस्के आवळावे अशी मागणी जोर धरत आहे.