🔸गुरुकुल शाळेची राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत बाजी
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र धनुर्विद्या संघटनेच्या जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व आर्चरी असोसिएशन ऑफ उस्मानाबाद डिस्ट्रिक्टच्या वतीने उस्मानाबाद येथील तुळजा भवानी जिल्हा क्रीडा संकुलावर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या राज्यस्तरीय धनुर्विद्या अर्थात तिरंदाजीच्या सामन्यात गुरुकुल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या सीबीएसईची विद्यार्थिनी कु. सायली श्याम गरड हिने 14 वर्षांखालील वयोगटात कांस्यपदक प्राप्त केले आहे. तिच्या यशामुळे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला. सदर विद्यार्थिनीच्या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विवेक भास्करवार यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
शाळेच्या मुख्याध्यापिका शेख आबेदा बेगम, उपमुख्याध्यापक शरीफ शेख यांनी कु. सायली गरड हिचा शाळेतर्फे सत्कार केला. सायलीला शाळेतील क्रीडा शिक्षक प्रा. सुनिल नेतनकर, आसिफ काझी, प्रदीप खेकाळे, प्रशिक्षक सुरेंद्र राठोड यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सायलीला शुभेच्छा देत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.