🔶दोन ठार, एक गंभीर जखमी
वणी वरोरा रोडवरील नायगाव जवळ कार व दुचाकीची धडक बसुन दोन तरुण ठार झाल्याची घटना आज दिनांक २८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. वणी येथील तिन तरूण वरोरा येथे कार्यक्रमासाठी गेले होते.कार्यक्रम आटोपून वणी कडे दुचाकीने येत असताना नायगाव जवळ वणी कडून जाणाऱी कार व दुचाकीची समोरा समोर धडक बसल्याने आकाश गाउत्रे,२८ अमन मडावी २९ हे मरण पावले,तर रानु तुमराम,२७ हा गंभीर जखमी झाला आहे. वणी पोलिसांना माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह व जखमीला वणी येथील ग्रामिण रुग्णालयात दाखल केले.पुढील तपास वणी पोलिस करीत आहे.