मांगली येथील शेतकरी विकास विद्यालयात शनिवारी १० वीच्या वियार्थ्याकरिता निरोप समारंभ ठेवण्यात आला होता .
समारंभाच्या अध्यक्षस्थानी मुख्या . मुत्यलवार सर होते . प्रमुख अतिथी म्हणून श्री .पारखी सर चिट्टलवार सर नाकले सर चा माटे सर काळे सर उपस्थित होते .
आधुनिक विद्येची देवता क्रांतीज्योती सावित्रीबाई फूले यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली .
याप्रसंगी प्रास्ताविक विचारात कठोर मेहनती शिवाय जगात काहीच नाही . असे प्रतिपादन चा माटे सरांनी केले . त्यानंतर काही विद्यार्थांनी आपले मनोगत व्यक्त केले .
वर्ग१०वी चे वर्गशिक्षक चिट्टलवार सर यांनी भविष्यात वियाथ्र्यांनी यशस्वी होवून आपल्या शाळेबरोबरच शिक्षकांना विसरू नये असा सल्ला दिला .
ज्ञान ;शिस्त ;संस्कार या आधारे स्वतः बरोबर शाळेचे नांव चमक वा असे प्रतिपादन नाकले सरांनी केले.
निरोप घेणे ' या शब्दामध्येच कारुण्य भरलेले आहे . निरोप समारंभ हा ताटातुटीच्या दुःखाचा ;विलक्षण हूरहूर दाटण्याचा एक उत्कट प्रसंग असतो . या आठवणी चिरंतर स्मरणात असतात . असे उदगार पारखी सरांनी मांडले .
१०वीच्या विद्याथ्र्यांनी भेटवस्तू म्हणून कार्यालयीन उपयोगासाठी गोदरेज आलमारी एक आठवण म्हणून भेट दिली . ही भेट स्विकारतांना आनंद झाला . याप्रसंगी
" आवडते ही मज मनापासूनी शाळा,
लाविते लळा ती जसा माऊली बाळा" हे वाक्य या प्रसंगी उदगारले आणि विद्याथ्र्यांचे आभार मानून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या .
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ९वीची विद्यार्थीनी कु . रेशमा मादेवार तर आभार प्रदर्शन कु .आचल गोरे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यालयाचे सेवक कर्मचारी व सर्व वियार्थ्यानी मेहनत घेतली तदनंतर सर्व वियाथ्र्यांना भोजन देण्यात आले .व त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छाही देण्यात आल्या . निरोप समारंभ भावनिक वातावरणात संपन्न झाला.