वणी येथील ब्राम्हणी फाट्या च्या आसपास एका अज्ञात वाहनाने कामगाराला धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना काल सोमवारला सायंकाळी साडे नऊ वाजता च्या दरम्यान घडली.
किसन उद्धव पारखी (55) रा तलाव रोड वणी असे अज्ञात वाहनाच्या धडकेत ठार झालेल्या इसमाचे नाव आहे. किसन ब्राम्हणी रोडवर असलेल्या साई जिनींग येथे कामगार म्हणून काम करतात, दरम्यान आपले कर्तव्य बजावून नऊ ते सव्वा नऊ च्या दरम्यान घराकडे परत निघाले असता ऐका अज्ञात चारचाकी वाहनाने त्यांना धडक दिली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की, किसन यांचे शरीर छिन्न विछिन्न झाले होते. मृतदेह शव विच्छेदनासाठी वणी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले असून या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.