राज्य परिवहन दिग्रस आगारातील महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेची कार्यकारिणीची आमसभा नुकतीच घेण्यात आली. यामध्ये नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. दिग्रस आगार अध्यक्षपदी सोहेल खान व सचिवपदी सुधीर मुळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या बैठकीप्रसंगी राज्य परिवहन विभागीय सचिव तथा प्रादेशिक सचिव राहुल धार्मिक, गजेंद्र उमक सचिव यवतमाळ आगार, शरद केळकर अध्यक्ष यवतमाळ आगार, सुभाष अगलदरे सहसचिव यवतमाळ आगार, दिगंबर गुघाणे, इरफान खान आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता सुनील कांबळे, शेख ताजुल, प्रदीप डीके, नारायण इंगोले, मोहम्मद सलीम, अनिल राऊत, भाऊराव वाडेकर, अब्दुल नईम, संजय गावंडे, सुलतान भाई, नितीन चव्हाण, एम.एस. खडसे, निलेश गाडे, राहुल जगरे यांच्यासह आदी उपस्थित होते.