🔸तालुक्यात बेरोजगारांचा आकडा फुगतोय
तालुक्यातील शिवणी (धोबे),कानडा, झगडा मुक्ता, या गावातील ७८० हेक्टर जमीन क्षेत्रातील १.२५ दंश लक्ष टन कोळसा उत्पादनाचे प्रस्तावाबाबत दि.१३ ऑक्टोंबर २०१३ ला शिवणी धोबे येथे कोळसा खाण प्रकल्पाची जन सुनावणी झाली होती. तेव्हापासून या प्रकल्पाची प्रक्रिया पूर्णपणे बंद झाली असल्यामुळे सदर चारही गावातील बेरोजगारीचा प्रश्न कायम आहे. त्यामुळे तातडीने उपाययोजना करुन कोळसा ओपन कास्ट खदान तात्काळ सुरु करण्याची मागणी
श्री.हंसराजजी भैय्या अहीर साहेब राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग (भारत सरकार) तथा पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री
यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
मारेगाव तालुका हा मागासलेला तालुका आहे. या तालुक्यात एकही प्रकल्प अस्तित्वात नाही, त्यामुळे दिवसेंदिवस बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे. तालुक्यात एकमेव ओपन कॉस्ट कोळसा खाण उत्पादन प्रकल्प आहे. शिवणी (धोबे), कानडा, झगडा मुक्ता या गावातील ७८० हेक्टर जमीन क्षेत्रातील १.२५ दश लक्ष टन प्रती वर्ष कोळसा उत्पादनाचे प्रस्तावाबाबत दिनांक १३ ऑक्टोंबर २०१३ ला शिवणी (धोबे) येथे कोळसा खाण प्रकल्पाची जन सुनावणी झाली होती. त्यानंतर सेक्शन ४ लाऊन सेक्शन ७ चा प्रस्ताव पाठवून सुद्धा त्याचा काही पाठपुरावा झाला नाही. नंतर एमओसि ला पाठवण्यात आला होता. परंतु तेव्हापासून या प्रकल्पाची प्रक्रिया पूर्णपणे बंद झाली असल्यामुळे सदर चारही गावात बेरोजगारीचा प्रश्न कायम आहे. त्यामुळे सदरील प्रकल्प तातडीने मार्गी लावून बेरोजगारी चा प्रश्न दूर करावा अशी मागणी सरपंच-निलेश रासेकर शिवणी (धोबे), माजी सरपंच - जगदीश काटवले, माजी सरपंच - पांडुरंग लोहे यांच्यासह निलेश ढेंगळे, अजिंक्य काटवले, अक्षय बडवाईक,सचिन रासेकर यांनी दि.05/03/2023 मा.श्री.हंसराजजी भैय्या अहीर साहेब राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग व पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय उपाध्यक्ष ओबीसी मोर्चा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.