वणी :- प्रतिनिधी
तालुक्यातील गणेशपुर येथील तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना आज दि.16 ला घडली.
सुधीर उर्फ अनिल मारोती पहापळे वय २६ वर्ष असे मृतकाचे नाव असून गणेशपुर ता.वणी येथील तो रहवासी होता. मृतक सुधीर यांनी आपल्या राहत्या घरी विष प्राशन केले.
मृतक सुधीर ने विष प्राशन केले ही बाब घरच्यांच्या लक्षात येताच त्याला संध्याकाळी ६.०० वाजता ग्रामीण रुग्णालय वणी येथे दाखल केले असता त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. आत्महतेचे कारण मात्र कळू शकले नाही.पुढील तपास वणी पोलीस करीत आहे.