वणी :- प्रतिनिधी
तालुक्यातील वेळाबाई येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून माँ जिजाऊ महिला मंडळ यांच्या वतीने जागतिक महिला दिनाचे आयोजन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मंचावर करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी नवनिर्वाचित सरपंच रंजनाताई बांदूरकर तर उद्घाटक छायाताई उलमाले, प्रमुख पाहुणे ऍड. स्मिताताई बोथले होत्या.तसेच विचार मंचावर मा जिजाऊ महिला मंडळच्या अध्यक्षा अंजु डाहुले,सचिव रजनी वाढनकर उपस्थित होत्या
कार्यक्रमाच्या प्रथम ज्येष्ठ महिलांना शाल व स्मृती चिन्ह देऊन गौरविण्यात आले. त्यानंतर महिलादिना निमित्त बोलताना डॉ. श्रद्धा पेंदाने यांनी मी जिजाऊ बोलते, मी सावित्री बाई बोलते, मी इंदिरा गांधी बोलते, मी मदर तेरेसा,बोलते मी डॉ.आनंदी बोलते, मी रमाई बोलते, असे एकपार्टी प्रयोगाचे सादरीकरण केले. व स्त्री रोगावरील उपाय योजना वर प्रकाश टाकत आपले भाषण संपविले.
तर ऍड. स्मिताताई बोथले यांनी महिलांना कायद्यातील सौरक्षण याबद्दल माहिती दिली. अध्यक्षीय भाषणामध्ये बोलताना गावच्या सरपंच यांनी गावाचा विकास कसा करता येईल व त्यासाठी लागणारा निधी आणन्यास मी सदैव तत्पर राहील अशा आशेचे अभिवचन देत आपले अध्यक्ष भाषण संपविले.
त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. गावातील सर्व नारीशक्ती नी एकजुटीने कार्यक्रमात सहभाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली.त्याच बरोबर सर्व गावकर्यांनी कार्यक्रमास उपस्थित राहून स्त्री पुरुष समानतेचा छान संदेश दिला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शितल वडस्कर, मंजू डाहुले, रंजना वाढनकर यांनी केले तर आभार प्रदर्शन शितल वडस्कर यांनी केले.