वणी: प्रतिनिधी
चंद्रपूर जिल्ह्यातील ३३ वर्षीय तरुण हा राजूर येथे परिवारासह वास्तव्यास होता.५ एप्रिल रोजी दुपारी त्याने राहत्या घरी साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.अजय जगण केवट वय ३३ वर्ष असे मृतकाचे नाव असून .तो मुळचा जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी होता.तो सध्या राजुर कॉलरी येथे परिवारा सोबत किरायाच्या घरी भाड्याणे राहत होता .त्याने आत्महत्या का केली हे मात्र कळू शकले नाही. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच वणी पोलिस घटनास्थळी दाखल होऊन घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदना करिता ग्रामीण रुग्णालयात वणी येथे दाखल करण्यात आला. पुढील तपास वणी पोलिस करीत आहेत.