वणी :- ग्रामपंचायत कार्यालय वेळाबाई येथे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वेळाबाई ग्रामपंचायतचे उपसरपंच श्री.संदीप मेश्राम होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचायत सदस्य श्री.शिवशंकर नांदे होते.
त्याचप्रमाणे यावेळी गावातील नागरिक दशरथ पायघन,वैभव उरकुडे,अमोल देवाळकर,प्रमोद बांदूरकर,गजानन खोले,विरु गेडाम,विशाल वासेकर,ग्रामपंचायत कर्मचारी अशोक वाघाडे, गजानन गोचे, हे देखील उपस्थित होते.
दरम्यान,जयंतीनिमित्त कार्यालयाच्या वतीने महान समाजसुधारक महात्मा ज्योतीबा फुले यांच्या प्रतिमेस यांच्या संदीप मेश्राम हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. ग्रामपंचायत सदस्य शिवशंकर नांदे यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकत त्यांच्या कार्याची माहिती दिली. सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दशरथ पायगन यांनी केले तर आभार प्रदर्शन अमोल देवाळकर यांनी केले.