वणी :- आज दिनांक 14 एप्रिलला ग्रामपंचायत कार्यालय वेळाबाई येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष गावच्या सरपंच रंजना शंकर बांदुरकर तर प्रमुख पाहुणे वेळाबाईचे पोलीस पाटील रमेश डाहुले होते. त्याचबरोबर विचारमंचावर संदीप मेश्राम,राहुल उलमले, शिवशंकर नांदे,आशा खोले,शंकर बांदुरकर, बाबाजी येसेकार, शामराव मोहितकर, किशोर शंकावर,लक्ष्मण उमरे, नत्थूजी विंचू व समस्थ गावकरी कार्यक्रमाला हजर होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्रा.पं. सरपंच यांनी डॉ. बाबासाहेबांच्या जीवनावर प्रकाश टाकत आपले मनोगत व्यक्त केले तर ग्रामपंचायत सदस्य शिवशंकर नांदे ,शंकर बादूरकर,विलास ढेंगळे, किशोर शंकावर यांनी सुद्धा डॉ बाबासाहेब यांच्या जीवनावर प्रकाश टाकत त्यांच्या महान कार्याची माहिती दिली. सदरील कार्यक्रमाचे सूत्र संचालन विलास ढेंगळे यांनी केले तर आभार प्रदर्शन शिवशंकर नांदे यांनी केले.