🔸शिरपूर पोलिस ठाणेदाराला दिले निवेदन
वणी:- तालुक्यातील शिरपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वेळाबाई गावात अवैधरित्या दारू विक्री चालू असल्याने गावातील ग्रामस्थांच्या लेखी व तोंडी तक्रारी वारंवार सरपंच यांच्या दरबारी गेल्या होत्या. त्यामुळे त्यांची दखल घेऊन महिला सरपंच सौ. रंजना शंकर बांदुरकर यांच्या नेतृत्वाखाली महिलांना घेऊन शिरपूर पोलिस ठाणे गाठून पोलिस निरीक्षक गजानन करेवाड यांना गावातील सुरू असलेली अवैध दारू बंद करावे अशी मागणी केली. या अवैध दारूमुळे गावातील महिला व तरुणींना मोठ्या प्रमाणात नाहक त्रास सहन करावा लागतो. परिणामी गावातील तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात आहे. गावात भांडण तंटे होण्यास चालना मिळत आहे. त्यामुळे गावातील शांतता व सुव्यवस्था धोक्यात आली असून गावातील अवैधरित्या सुरु असलेली दारू विक्री त्वरित बंद करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.यावेळी सरपंच रंजना बांदूरकर ,संगीता राजूरकर,मनीषा डाहुले,वृंदा रासेकर,गयाबाई अंकावर,शोभा मुसळे,मंजुषा गेडाम,बेबी पायघन,विमल पारखी,विमल गेडाम,सुनीता हनुमंते,संगीता मेश्राम,वंदना घुगुले, सुनिता बांदूरकर,अनिता गाताडे,शारदा महाकुलकर,विराबाई पेंदाने, शीतल पेंदाने ,संगीता बोबडे,अर्चना बोबडे,अंजु डाहुले,बेबी सातपुते,बेबी तिखट,मीना डाहुले,मनीषा कोल्हे आदी उपस्थित होते.