वणी :- तालुक्यातील मोहदा ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या,गावा जवळच असलेले छोटे पूल हे गेले कित्येक दिवसापासून बंद होण्याच्या मार्गावर असून. येथील नागरिकांना येजा करण्याकरिता रोज कसरत करावी लागते, सदर मार्ग वेळाबाई ते नेरड पुरड असा असून रस्त्याची अतिषय दयनीय अवस्था झाली असल्याची माहिती आहे.सदरील मार्गावर ओवरलोड गिटी क्रेशरच्या वाहनाची रहदारी मोठ्या प्रमाणात होते.
सदरील मार्ग चंद्रपूर ते मुकुडबन,वणी ते वेळाबाई मार्गे मुकुडबन,राजुरा ते वेळाबाई मार्गे मुकुडबन अशी या रस्त्याने महामंडळाची बस सेवा सुरू आहे.तसेच या मार्गी दोन चाकी व तीन चाकी वाहनाची रहदारी मोठ्या मोठ्या प्रमाणात असते. महत्वाचे म्हणजे आता काहीच दिवसात पावसाळा लागणार आहे व मुलांचे शाळेचे दिवस चालू होणार आहे त्यात कृष्णांपुर धुंनकि मोहदा येथील मुल वेळाबाई येथे विद्यालयात शिकायला येतात.अश्यातच जर या पुलाचे काम लवकरात लवकर नाही झाले.तर याचा सरळ फटका विद्यार्थ्यांना बसेल. त्याचप्रमणे सदर मार्गावरील नादुरुस्त पुलाचा नाहक त्रास सर्वाना सहन करावा लागत आहे.
मोहदा गावातील सरपंचयांच्या पुढाकाराने गिट्टी आणून त्या पुलाचे डागडूगीचे काम केले असता. सध्या स्थितीत पूल चालू आहे, परन्तु पुलाचा बाजूला मोठा प्रमाणात पाणी साचून असल्यामुळे तो पूल कधी जमीनदोस्त होईल हे सांगता येत नाही. सदर पूल दुरुस्ती करिता मोहदा येथील सरपंच वर्षाताई राजूरकर व उपसरपंच सचिन रासेकार यांनी दिनांक 02/01/2023 ला उपविभागीय सार्वजिंक बांधकाम विभाग यांना निवेदन दिले. त्याचप्रमणे सदरील विभागाचे आमदार व तहसीदार यांना देखील लेखी निवेदन दिलेअसून, सदर निवेदनाची कुठल्याही प्रशासन दरबारी दखल घेतली जात नाही हि मात्र मोठी शोकांतिका आहे. परिणामी जनतेने आपला प्रश्न सोडवन्या करिता जायचे तरी कुठे? हा प्रश्न मात्र सद्या तरी अनउत्तरीत आहे.