दिनांक 18/06/2023 रोजी गट ग्राम पंचायत कान्हाळगांव केगाव येथे ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद यवतमाळ च्या वतीने जल जिवन मिशन कार्यक्रम अंतर्गत पाणी पुरवठा योजनेचे आमदार बोदकुरवार साहेब यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
केगाव गावात वाढती पाण्याची टंचाई लक्षात घेता केगाव येथील युवा उपसरपंच अंकुश आवारी यांनी प्रशासनाकडे सतत पाठपुरावा करून जल जिवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना मंजूर केली.या कार्यात मा. सरपंच संजय भाऊ येरमे यांनीसुद्धा मोलाचे सहकार्य केले.
मा. उपसरपंच अंकुश आवारी यांनी उपसरपंच पदाचा कार्यभार स्वीकारला तेव्हापासून त्यांनी झपाट्याने विकास कामे केली.
मा. उपसरपंचाच्या संकल्पनेतून गावाची विकासाकडे वाटचाल होत आहे आणि त्यातूनच सन 2022-2023 या आर्थिक वर्षांत 35 लक्ष 88 हजार 100 रुपये निधी प्रशासनाकडून मंजुर करवून आणला.
या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीत म्हणून गट ग्राम पंचायत कान्हाळगांव केगाव चे संरपच मा. संजय भाऊ येरमे केगाव येथील युवा उपसरपंच मा. अंकुश आवारी व ग्रामपंचायत सदस्य आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.