ग्रामपंचायत वेळाबाई ता.वणी जि.यवतमाळ येथे स्वातंत्र्याचा अमृत मोहोत्सव विविध कार्यक्रम करून साजरा करण्यात आला. दिनांक १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट पर्यंत ध्वजारोहण करण्यात आले.”मेरी मिट्टी मेरा देश” हा उपक्रम दिनांक १४/०८/२०२३ ला घेण्यात आला. त्यात शिलाफलक तयार करून त्याचे अनावरण सरपंच सौ.रंजनाताई शंकर बांदुरकर यांच्या अध्यक्षतेखाली व गावकऱ्यांच्या उपस्थितीत माझी सेवा निवृत्त सैनिक श्री. गुलाबराव दादाजी राजूरकर यांचे हस्ते करण्यात आले. त्यानंतर गावातील सर्व सैनिकांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी सौ.रंजनाताई शंकर बांदुरकर तर प्रमुख पाहुणे म्हणूल लाभलेले श्री.रमेशजी डाहुले पो.पा. वेळाबाई, श्री.संदीपजी मेश्राम उपसरपंच,श्री.गुलाब राजूरकर सेवानिवृत्त सैनिक, श्री.रमेश बोबडे से.सैनिक, श्री.मंगेश शेंडे सैनिक, श्री.प्रशांत ढेंगळे सैनिक, श्री.महेश पेंदाने सैनिक,श्री.विनोद मडावी सैनिक, श्री.काशिनाथ डाहुले सैनिक, श्री.नंदकिशोर गोवारदीपे सैनिक, श्री.संदीप मडावी पो.उपनिरीक्षक यांचे तर्फे यांचे कुटुंबातील व्यक्ती उपस्थित असून त्यांचा सत्कार करण्यात आला. माझी सेवानिवृत्त सैनिक श्री गुलाब राजूरकर यांनी युवकांना मार्गदर्शन केले.तसेच श्री.गजाननजी शेडामे, श्री.उलमाले सर,श्री.शंकरजी बांदुरकर, कार्याक्रमाचे अध्यक्ष सौ.रंजनाताई बांदुरकर यांनी गावकऱ्यांना मार्गदर्शन केले.सदर कार्यक्रमात शिलालेख स्थापन केले, सैनिकाचा स्वागत सत्कार केला, दिवे लावून शपथविधी घेतली, अमृत कलश तयार केले व वृक्ष लागवड केली.
१५ ऑगस्ट रोजी ध्वजारोहनाच्या कार्यक्रमाला सर्व पदाधिकारी, सर्व गावकरी, शाळकरी विध्यार्थी, शिक्षक वृंद, उपस्थित होते. यांच्या सर्वांच्या उपस्थितीत माझी सेवानिवृत्त सैनिक श्री.गुलाबजी राजूरकर यांचे हस्ते झेंडा वंदन करण्यात आले.