विज कोसळून सालगड्याचा मृत्यू
0
वणी तालुक्यातील बोरगाव ,मेंढोली येथे सालगाड्याचा विज पडून मृत्यू झाल्याची घटना दिनांक 2 सप्टेंबर ला सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास् घडली असून. मृतक सालगड्याचे नाव संजय दिवानजी पहुकर वय 45 मु.बोरगाव(में) ते बोरगाव येथील पोलीस पाटील बल्की यांच्या कडे सालगाडी म्हणून कामाला होते. नेहमी सारखे शेतात काम करत असताना काळाने घात् केला. काम करत असताना अचानक् वातावरणाध्ये बदल झाल्याने पाण्याला सुरुवात झाली. व विजासह् पाऊस पडत असताना त्यांच्या अंगावर। अचानक विज कोसळून त्यांचा जागीच मृत्यू झाला, त्यांच्या मागे, पत्नी, मुलगी, आई ,भाऊ, असा आप्त परिवार् आहे घरातील कर्ता पुरुष गेल्याने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे .
Tags