वेळाबाई मध्ये श्री गुरुदेव मंडळाचा वृक्षा रोपण कार्यक्रम उत्साहात साजरा..
0
वेळाबाई गावा मध्ये श्री गुरुदेव प्रचारक समिती द्वारे आज वृक्षारोपण व ग्रंथदान् सोहळा पार पडला.अ.भा.श्री. गुरुदेव भजन मंडळ श्री क्षेत्र गुरुकुंज आश्रम मोझरी द्वारा संचालित श्री गुरुदेव सेवा मंडळ यवतमाळ जिल्हा कार्यकारनि यांनी दिलेल्या विनंती नुसार श्री गुरुदेव सेवा मंडळ वणी तालुका तसेच अखिल भारतीय गुरुदेव् सेवा मंडळ वेळाबाई तसेच सर्व वेळाबाई ग्रामवाशियातर्फे, तुकडोजी महाराज् मंदिर परिसरात कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाला सन्माननीय गावातील प्रथम नागरिक सरपंच सौ.रंजना ताई बांदूरकर उपसरपंच संदीपजी मेश्राम ,गावातील प्रतिष्ठित नागरिक माजी सभापती अनिल भाऊ राजूरकार ,उलमाले गुरुजी, वणी गुरुदेव प्रचारक सौ.दरेकर ताई, यवतमाळ प्रचार प्रमुख मारोतरावं ठेंगने साहेब ,वणी प्रचार प्रमुख अरविंद जी दुर्गे, पद्सिद्ध सदस्य वणी तालुका अशोकराव खाडे, आदी उपस्थित होते.सर्व प्रमुख पाहुण्यांचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले तर कोरोना काळात देहांत झालेल्या स्व. ऑड.अशोकराव मानकर व स्व.नथुजी राजूरकार यांना श्रद्धांजली वाहून त्यांच्या नातेवाईकांना सन्माणीत करण्यात.तसेच गावातील तरुण गुरुदेव् मंडळातील पुरुषोत्तम वाढणकर ,विनोद पायघन् , वसंता गेडाम ,संयोग मेश्राम नयन गेडाम या कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आले .व वृक्षा रोपण करण्यात आले.आणी प्रमुख पाहुण्यांचे भाषण झाले सरपंच ताई यांनी आपले अध्यक्षीय भाषण केले तर कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रचार प्रमुख् दिलीप जी डाखरे यांनी केले आणी आभार प्रदर्शन राजकुमार वडसकार यांनी केले...
Tags