मारेगाव :- प्रतिनिधी
मारेगाव येथून नवरगावला आपल्या चुलत भावाच्या मयतीसाठी दुचाकीने जात असताना करणवाडी जवळील नायरा पेट्रोल पंपासमोरील पुलाजवळ यशवंत नामदेव डवरे वय अंदाजे ४८ वर्ष रा. ता. मारेगाव यांनी दुचाकीने ट्रकला मागून धडक दिली. यात दुचाकीस्वार चालक गंभीर जखमी झाले. ही घटना दिनांक १८ एप्रिल २०२४ रोजी गुरुवारला सायंकाळी ८:३० वाजताचे दरम्यान घडली.या अपघातात यशवंत हे गंभीर जखमी झाले असून.अपघात घडताच रस्त्याने येजा करणाऱ्या काही नागरिकांनी मदत करत त्याला लगेच मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तिथे त्याच्यावर प्राथमिक उपचार करून, पुढील उपचार साठी चंद्रपूर येथे हलवीण्यात आल्याची माहिती आहे.