वणी :- प्रतिनिधी
महामार्ग ओलांडणाऱ्या 32 वर्षीय महिलेला भरधाव दुचाकीने धडक दिली. यात महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. योगिता अनिल सूर (32) असे मृतक महिलेचे नाव आहे. ती आपल्या परिवारासह तालुक्यातील पुनवट येथे वास्तव्यास होती. सायंकाळी शनिवार दिनांक 20 एप्रिल ला 7:30 वाजता ती शौचास जात असताना भरधाव वेगात असलेल्या दुचाकी क्रमांक MH-29-AP- 1965 जबर धडक दिली.घटना घडताच गंभीर जखमी झालेल्या महिलेला उपचारार्थ चंद्रपूरला हलविण्यात आले. परंतु वाटेतच तिचा मृत्यू झाला, तिच्या पश्चात पती, एक मुलगा व मुलगी आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करीत आहे.