रासा येथील शेत शिवारातील बंड्यातून चोरट्यानी कुलूप तोडून मिरची लंपास केल्याची घटना घडली आहे.तालुक्यातील रासा शेत शिवारात पेट्रोल पंप पासून अवघ्या अर्धा किलोमीटर अंतरावर भारत शंकर कुमरे या शेतकऱ्याचे शेत आहे. शेतात साहित्य ठेवण्यासाठी बंडा बांधण्यात आला आहे. सदर शेतकऱ्याने ऑगस्ट महिन्यात मिरची लागवड केली होती. त्यानंतर मिरची तोडून बंड्यात साठवून ठेवली होती. नेहमीप्रमाणे भारत कुमरे शेतात गेले असता त्यांना बंड्याचे कुलूप तुटून पडलेले दिसले. बंड्याच्या आत प्रवेश केल्यानंतर बंड्यात ठेवलेली सहा पोते मिरची चोरी गेल्याचे लक्षात आले. सदर घटनेची रीतसर तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.