सामाजिक कार्यकर्ते विजय चोरडिया उतरणार विधानसभेच्या मैदानात
वणी :- समाजसेवेचा ध्यास घेतलेले आणी मागील अनेक वर्षापासुन गरजवतांसाठीचा "हक्काचा माणूस" म्हणून समाजसेवेचे कार्य अवीरतपणे, दायित्व म्हणून सेवाभावी वृत्तीने पुढे नेत असलेले, समाजसेवी तथा भाजपा राज्य कार्यकारिणी सदस्य विजयबाबू चोरडीया यांनी आता, सत्तेच्या न्यायमंदिरात जावून अधिक जोमाने जनकल्यान करण्यासाठी पक्षश्रेष्ठीकडे विधानसभेची दावेदारी दाखल केली आहे. मागील दोन दशकापासुन अविरतपणे जनतेप्रती न्यायाचे समाजकारण, राजकारण करीत असल्यामुळेच, माझा पक्ष माझ्या कार्याची दखल घेईलच हा माझा विश्वास असून मला पक्षाने विधानसभेची उमेदवारी दिली तर विजयीपथाला गवसनी घालून "विजय" प्राप्त करेन व पक्षाने टाकलेला विश्वास सार्थ करून दाखवीलचं, असा विजयी आशावाद समाजसेवी विजयबाबू चोरडीया यांनी व्यक्त केला. ते वणी येथील श्री विनायक मंगल कार्यालयाचे सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलतं होते.
जाती-पातीच्या पलीकडे जाऊन सर्वांगाने राबवित असलेल्या सामाजिक कार्यामुळेच समाजसेवी विजयबाबू चोरडिया यांचे सर्वच स्तरातील जनमानसांशी वैयक्तिक जिव्हाळ्याचे संबंध प्रस्तापित झाले आहे. यासह पक्षीय स्तरावरील विविध सामाजिक राजकीय उपक्रमामुळे ग्रामीण कार्यकर्त्यांची नेतृत्वाचे प्रती असलेली नाळ विजयबाबूच्या रुपाने अधिक घट्ट जुळल्याने, पक्षीय स्तरावरील देखील हक्काच नेतृत्व म्हणून विजयबाबू यांचेकडे बघितल्या जाते आहे. इतकेच नाही तर, सर्वसामान्यांच सक्षम नेतृत्व आणि विधानसभेच्या विजयीपथावर विजय संपादन करणार नेतृत्व म्हणून देखील संपूर्ण वणी विधानसभा क्षेत्रातील पक्षीय कार्यकर्त्यासह सर्वसामान्य जनतेमध्ये ओळख निर्माण झाली आहे, हे विशेष.
पक्षात उमेदवारी मागण्याचा प्रत्येकाला अधिकारी आहे. मी मागील 35 वर्षांपासून समाजकारणात असून गेल्या 20 ते 25 वर्षांपासून राजकारणात आहो. सध्या विधानसभेसाठी विरोधी पक्षातर्फे कुणबी उमेदवारांची चर्चा सुरु आहे. त्यामुळे कुणबीत्तर उमेदवार म्हणून मी एक सक्षम पर्याय भाजपकडे आहे. त्यामुळे पक्ष माझ्याबाबत नक्कीच विचार करेल, अशी मला आशा आहे.विजयबाबु चोरडिया