Type Here to Get Search Results !

महात्मा फुले अभ्यासिकेचे आज उद्घाटन



संजय खाडे फाउंडेशनचा उपक्रम
करिअर कॉन्सलर विजय मुसळे यांच्या व्याख्यानाचे आयोजन
वणी - स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना तयारी व अभ्यास करण्यासाठी वणीतील जटाशंकर चौक येथे महात्मा फुले अभ्यासिका स्थापन करण्यात आली आहे. सोमवारी दिनांक 12 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 4 वाजता मान्यवरांच्या उपस्थित या अभ्यासिकेचे उद्घाटन होणार आहे. उद्घाटनानंतर शेतकरी मंदिर येथे करिअर कॉन्सलर विजय मुसळे यांचे देशविदेशातील शिक्षणाच्या संधी या विषयावर व्याख्यान होणार आहे. संजय खाडे फाउंडेशनतर्फे हा उपक्रम राबवला जात आहे. स्व. रामचंद्र खाडे यांच्या स्मरनार्थ ही अभ्यासिका स्थापन कऱण्यात आली आहे. 

कार्यक्रमाचे उद्घाटन खा. प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते होणार आहे. डॉ. भालचंद्र चोपणे हे या सोहळ्याचे अध्यक्ष राहणार आहेत. आमदार सुधाकर आडबाले व माजी आमदार वामनराव कासावार हे यांची या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून उपस्थिती राहणार आहे. नरेंद्र ठाकरे, ऍड देविदास काळे, प्रा. दिलीप मालेकर, विजय मुकेवार, अरुणा खंडाळकर हे या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आहेत. 

विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक सुविधा - संजय खाडे
अनेक विद्यार्थ्यांच्या घरी अभ्यासासाठी पोषक वातावरण नसते, सोयी सुविधांचा अभाव असते. त्यामुळे ही अभ्यासिक स्थापन करण्यात आली आहे. उत्तम बैठक व्यवस्था, एसी, ऑनलाईन अभ्यास, सुसज्ज लायब्रेरी व अत्याधुनिक सुविधा अशी या अभ्यासिकेची वैशिष्ट्ये आहेत. याचा विद्यार्थ्यांना नक्कीच लाभ होईल. 
- संजय खाडे, जिल्हा सरचिटणीस काँग्रेस

सं. 4 वाजता जटाशंकर चौक येथे अभ्यासिकेच्या उद्घाटनानंतर मान्यवरांचे स्वागत, मनोगत इत्यादी कार्यक्रम शेतकरी मंदिर येथे पार पडणार आहे. तसेच करिअर कॉन्सलर विजय मुसळे यांचा 12 वी नंतर पुढे काय व देश विदेशातील शिक्षण व रोजगाराच्या संधी या विषयाव व्याख्यान होणार आहे. अभ्यासिकेचा तसेच व्याख्यानाचा परिसरातील विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संजय खाडे यांच्या द्वारे करण्यात आले आहे.  

घोडदरा येथील विद्यार्थ्यांचे निवेदन
शेतकरी न्याय यात्रेला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. ठिकठिकाणी लोक आशिष खुलसंगे यांना विविध समस्येवर निवेदन देत आहेत. घोडदरा येथील विद्यार्थ्यांना मारेगाव येथे शिक्षणासाठी जाण्यास कोणतेही वाहन नाही. त्यांना 3 किलोमीटरची पायपीट करत खडकी बस थांब्यावर जावे लागते. शिवाय पावसाळ्यात विद्यार्थ्यांना ओले होत थांब्यावर जावे लागते. त्यामुळे घोडदरा येथील विद्यार्थ्यांनी यात्रेत निवेदन देत बससेवा सुरु करण्याबाबत निवेदन दिले.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies