Type Here to Get Search Results !

कलावती बांदूरकर यांचा संजय खाडे यांना पाठिंबा


🔹खाडे यांनी थेट शेतक-यांच्या बांधावर जात घेतली मतदारांची भेट

वणी - गुरुवारी दिनांक 14 अपक्ष उमेदवार संजय खाडे यांचा बोटोणी सर्कल येथे प्रचार दौरा झाला. या प्रचार दौ-यात जळका येथे त्यांनी कलावती बांदूरकर यांची भेट घेतली यावेळी त्यांनी अपक्ष उमेदवार संजय खाडे यांना पाठिंबा जाहीर केला. त्यांनी जळका येथील पदयात्रेत सहभाग घेतला. या निवडणुकीत त्यांनी खाडे यांच्या पाठिशी उभे राहणार अशी माहिती प्रसार माध्यमांना दिली. दरम्यान आज संजय खाडे यांनी थेट शेतक-यांच्या बांधावर जात शेतक-यांशी संवाद साधला. तर मारेगाव येथे झालेल्या प्रचार सभेत त्यांनी शेतक-यांच्या प्रश्नांवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी माजी आमदार विश्वास नांदेकर, नरेंद्र ठाकरे, गौरीशंकर खुराणा, संजय आवारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

आज सकाळी नरसाळा येथून संजय खाडे यांच्या प्रचाराला सुरुवात झाली. त्यानंतर खैरगाव, खंडणी, बोटोणी, वागदरा, हटवांजरी, जळका, सराटी, बुरांडा, आवळगाव, मेंडणी येथे प्रचार दौरा झाला. या प्रचार दौ-यात त्यांनी शेतक-यांच्या बांधावर जात शेतक-यांशी संवाद साधला. संध्याकाळी मारेगाव येथे प्रचार सभा झाली. या प्रचार सभेत संजय खाडे यांनी शेतक-यांच्या प्रश्नांवर जोरदार हल्लाबोल केला. मारेगाव तालुक्यात जिल्ह्यातील सर्वाधिक आत्महत्या होतात. मात्र या गंभीर प्रश्नांकडे ना लोकप्रतिनिधींचे लक्ष आहे ना सरकारचे, अशी टिका त्यांनी आपल्या भाषणात केली. यावेळी विश्वास नांदेकर, नरेंद्र ठाकरे, गौरीशंकर खुराणा, संजय आवारी यांनी देखील विरोधकांचा सडेतोड समाचार घेतला.   

कलावंती बांदूरकर यांचा संजय खाडेंना पाठिंबा

कलावती बांदूरकर या जळका येथील रहिवासी आहेत. 2008 साली त्यांच्या पतीने दुष्काळामुळे आत्महत्या केली होती. राहुल गांधी यांनी त्यांची भेट घेतली होती. त्यामुळे संपूर्ण देशभरात त्या चर्चेत आल्या होत्या. आज संजय खाडे यांचा जळका येथे प्रचार दौरा झाला. यावेळी कलावती यांनी संजय खाडे यांची भेट घेत त्यांना पाठिंबा जाहीर केला. 


कलावती बांदूरकर म्हणाल्या की सरकारचे कास्तकारांकडे दुर्लक्ष होत आहे. इतके वर्ष झाले तरी सोयाबीन, कापूस याला अजूनही तोच भाव मिळत आहे. इतक्या वर्षात माणूस बदलला, जग बदलले मात्र अद्यापही शेतक-यांच्या शेतमालाचा भाव काही केल्या बदलला नाही. यामुळे कास्तकार मरत आहे. किमान 10 हजार कापसाला व 7 हजार सोयाबीनला भाव मिळायला पाहिजे. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांचा देखील उल्लेख केला. 


विदर्भ राज्य आघाडी तर्फे संजय खाडे यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. विदर्भ राज्य आघाडीचे कार्याध्यक्ष ऍड नीरज खांदेवाल यांनी पत्रक काढत खाडे यांना पाठिंबा जाहीर केला. तर शिवस्वराज्य मंच राज्यभिषेक सोहळा समितीतर्फे पत्रक काढत संजय खाडे यांना पाठिंबा जाहीर केला.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies