Type Here to Get Search Results !

भाजपचा संकल्पपत्र : वीजबिलात 30 टक्के सूट, 25 लाख नोकऱ्या आणि खतांवरील जीएसटी रक्कम शेतकऱ्यांना परत मिळणार




वणी : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने पक्षाचा जाहीरनामा (संकल्पपत्र) प्रसिद्ध केला आहे. या संकल्प पत्रात राज्यातील शेतकरी, लाडक्या बहिण, अंगणवाडी सेविका, बेरोजगार युवक, वृध्द पेन्शनधारक व सर्वसाधारण कुटुंबासाठी महत्त्वाच्या योजनेची घोषणा करण्यात आली
जाणून घेऊ काय आहे भाजपच्या जाहीरनाम्यात ?
• लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला रु. 1500 वरुन रु. 2100 देण्यात येईल. .
• शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजनेतून वर्षाला 12 हजार वरून 15 हजार रुपये मिळणार.
• प्रत्येक गरिबाला अन्न आणि निवारा देण्यात येईल.
• वृद्ध पेंशन धारकांना महिन्याला रु. 1500 च्या जागी 2100 रुपये देण्यात येईल.
• राज्यात जीवनावश्यक वस्तूंच्या किमती पुढील 5 वर्ष स्थिर ठेवण्यात येणार.
• येणाऱ्या काळात 25 लाख रोजगार निर्मिती तसेच महिन्याला 10 लाख विद्यार्थ्यांना 10 हजार विद्यावेतन देण्यात येईल.
• राज्यातील ग्रामीण भागात 45 हजार गावांत पांधण रस्ते बांधण्याचा संकल्प.
• अंगणवाडी आणि आशा सेविकांना महिन्याला 15 हजार पगार आणि विमा संरक्षण देण्यात येईल.
• वीज बिलात 30 टक्का कपात करुन सौर आणि अक्षय ऊर्जेवर भर देण्यात येईल.
• सरकार स्थापनेनंतर 100 दिवसांच्या आत ‘व्हिजन महाराष्ट्र @ 2029’ सादर करण्यात येईल.
• सन 2028 पर्यंत महाराष्ट्राला 01 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनविण्याचं लक्ष्य.
• ‘मेक इन महाराष्ट्र’ धोरण राबवून, महाराष्ट्राचे भारतातील प्रमुख उत्पादक राज्य म्हणून असलेले स्थान अधिक मजबूत करण्यात येईल.
• महाराष्ट्राला जागतिक फिनटेक व कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) राजधानी बनविण्यात येईल.
• नागपूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर आणि नाशिकला आधुनिक एरोनॉटिकल आणि स्पेस उत्पादन केंद्र बनवून प्रगत एरोस्पेस तंत्रज्ञान आणि उत्पादन हब म्हणून विकसित करण्यात येईल.
• शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सर्वांगीण उपक्रमांद्वारे प्रयत्न करण्यात येतील
• शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या खतांवरील संपूर्ण राज्य वस्तु व सेवा कर (SGST) अनुदानाच्या स्वरूपात शेतकऱ्यांना परत देऊ.
• शेतक-यांना सोयाबीनचे किमान 6 हजार रू.प्रति क्विंटल भाव मिळावा यासाठी सोयाबीन उत्पादन, प्रक्रिया आणि मूल्यवर्धनासाठी समर्पित संपूर्ण श्रृंखलेची स्थापना.
• सन 2027 पर्यंत महाराष्ट्रात 50 लक्ष लखपती दीदी तयार करण्याचा संकल्प.
• ‘अक्षय अन्न योजना’ अंतर्गत, कमी उत्पन्न गटातील कुटुंबांना दरमहा मोफत राशन.
• अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीय उद्योजकांच्या व्यवसाय वृद्धीसाठी 15 लाख पर्यंत व्याजरहित कर्ज देण्यात येईल.
• ओबीसी, एसईबीसी, ईडब्ल्यूएस, एनटी, व्हीजेएनटीमधील पात्र विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्काची प्रतिपूर्ती करण्यात येईल.
• सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र बाहारुग्ण कक्ष (OPD) सुरू करण्यात येतील.
• बळजबरी व फसवून केलेल्या धर्मांतराविरुद्ध कठोर कायदा.
या शिवाय इतर ही काही महत्त्वाच्या घोषणा भाजपच्या संकल्प पत्रात नमूद करण्यात आली आहे.




राज्याच्या विकासासोबतचा वणी मतदार संघाचा विकास करण्यासाठी भाजप उमेदवार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी 10 संकल्पाचा वचननामा जाहीर केला आहे. ते खालील प्रमाणे –
1. वणी येथील शासकीय रुग्णालय आधुनिक यंत्रसामुग्रीने सुसज्ज करणे.
2. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्राचे अत्याधुनिकरण करणे
3. वणी येथे अतिरिक्त एम.आय.डी.सी. निर्माण करणे. झरी तालुक्यात नवीन एम.आय.डी.सी. मारेगाव येथे मंजूर एमआयडीसी सुरू करणे.
4. वणी, मारेगाव आणि झरी तालुक्यातील सर्व बाजारपेठांमध्ये सर्व पिकांना हमीभावाने शासनाचे खरेदी केंद्र उघडणे
5. वणी येथील बसस्थानकाचे अद्ययावतीकरण करणे, महिला आणि विद्यार्थ्यांसाठी विशेष बसेसची सुविधा करुन नविन बसेस सुरु करणे
6. जनतेच्या सोयीसाठी तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन येथे आधुनिक सुविधा उपलब्ध करणे.
7. सर्व शासकीय योजनांचा लाभ मिळवुन देण्यासाठी सुविधा मार्गदर्शन कक्ष निर्माण करणे.
8. भाजपच्या जाहीरनाम्यात घोषित केल्याप्रमाणे, १५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज मिळविण्यासाठी व्यवसायांना मदत करण्यासाठी मार्गदर्शन केंद्र
9. वणी येथे सर्व शासकीय विभागाचे विभागीय व उपविभागीय कार्यालय उघडणे
10. वणी विधानसभा क्षेत्रात शाश्वत सिंचन सुविधा उपलब्ध करणे.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies