Type Here to Get Search Results !

वणी विधानसभेत सांगली पॅटर्न राबवा, संजय खाडे यांचे आवाहन


शिंदोला परिसरात प्रचाराचा धुराळा, राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांचा खाडे यांना पाठिंबा

वणी :- प्रतिनिधी
गेल्या 30 वर्षांपासून एक कार्यकर्ता म्हणून मी काँग्रेससाठी राबलो. सततच्या दोन टर्मच्या काँग्रेसच्या पराभवामुळे वणी विधानसभेत काँग्रेस कार्यकर्ता नैराश्यात गेला होता. विविध आंदोलने, सामाजिक उपक्रम राबवून पक्षाला नवी उभारी दिली. गेल्या दोन तीन वर्षात शिक्षण, रोजगार, सांस्कृतिक, क्रीडा, महिला सक्षमीकरण इत्यादी क्षेत्रात पक्षातर्फे भरीव काम केले. शेतकरी, शेतमजूर, रस्ते यासाठी मोर्चा काढला. आपल्याला जर कर्तृत्तवान, अन्यायाविरोधात लढणारा, तुमचे प्रश्न ताकदीने विधानसभेत मांडणारा उमेदवार हवा असल्यास, यंदा वणी विधानसभेत 'सांगली पॅटर्न' राबवा, असे आवाहन अपक्ष उमेदवार संजय खाडे यांनी मतदारांना केले.

शनिवारी त्यांचा लाठी-शिंदोला सर्कलमध्ये प्रचार दौरा झाला. या प्रचार दौ-याच्या वेळी झालेल्या कॉर्नर सभेत त्यांनी मतदारांना आवाहन केले. प्रचाराची सुरुवात संजय खाडे यांच्या उकणी या गावातून झाली. खाडे यांचे हे जन्मगाव असल्याने गावक-यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. यावेळी गावातील व्यक्ती विधानसभेत गेला पाहिजे अशी भावना गावक-यांनी व्यक्त करीत यंदा संजय खाडे यांच्या पाठिशी पूर्ण ताकदीने उभे राहणार असे वचन दिले.

उकणी नंतर शिंदोला सर्कलच्या दौ-याला सुरुवात झाली. ढाकोरी, निंबाळा, देउरवाडा, पारडी, कुरई, डोर्ली, वेळाबाई, मोहदा, कृष्णानपूर, टुंड्रा येथे प्रचार ताफा पोहोचला. गावक-यांनी फटाक्याच्या आतषबाजीत प्रचार ताफ्याचे स्वागत केले. गावक-यांनी हार घालून खाडे यांचे स्वागत केले. यावेळी जनसंवाद यात्रा काढण्यात आली. या रॅलीत संपूर्ण गाव सहभागी झाले. यावेळी शिट्टीच्या आवाजाने संपूर्ण परिसर निनादून गेला. खाडे यांनी गावातील सुशिक्षित बेरोजगारांशी संवाद साधत रोजगाराची समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले.


मोबीन शेख यांचा संजय खाडे यांना पाठिंबा
युवक राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष मोबीन शेख यांनी अपक्ष उमेदवार संजय खाडे यांना आपला पाठिंबा दर्शवला. मोबीन यांनी शुक्रवारी सकाळी खाडे यांची खाती चौक येथील प्रचार कार्यालयात भेट घेतली. यावेळी त्यांचे सहकारी जवीज शेख-तालुका उपाध्यक्ष, नरेंद्र धुमारे - तालुका अध्यक्ष युवक रा. काँग्रेस, महेंद्र बळगुळ शहर उपाध्यक्ष, रहमान शेख सचिव राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी, अमर नगराळे सचिव यांनी देखील खाडे यांना पाठिंबा दर्शवला. संजय खाडे यांना जनतेच्या प्रश्नांची जाण आहे व तेच विधानसभेचा चेहरा मोहरा बदलवू शकतात, त्यामुळे त्यांना पाठिंबा दर्शवत असल्याचे त्यांनी स्पष्ट केला.



बुथ कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग
रविवारी स. 10 वा. कार्यकर्ते व समर्थकांसाठी बूथ प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर एएसएल लॉन एसपीएम शाळेच्या मागे येथे होणार आहे. या शिबिराला युवा समर्थकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
 
रविवारी खाडे यांचा झरी तालुक्यात प्रचार दौरा आहे. दु. 12.30 वा. झमकोला येथून प्रचाराला सुरुवात होणार आहे. त्यानंतर निमणी, शिबला, हिवरा बारसा, कटली बोरगाव, जुनोनी, चिंचघाट, बोपापूर, खडकडोह, अडकोली, पवनार, पांढरकवडा, भेडाळा इ. गावात पदयात्रा काढली जाणार आहे.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies