Type Here to Get Search Results !

संजय खाडे यांच्या प्रचारासाठी पत्नी संगीता खाडे मैदानात

महिलाशक्तींनी पिंजून काढले वणी शहर, रोज विविध गावांचा दौरा 

वणी:- प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण रंगले आहे. प्रचारासाठी आता अवघा अवघा आठवडा उरला आहे. सभा, बैठका आणि मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या जात आहेत. त्यामुळे प्रचाराचा धुराळा उडाला आहे. अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या पत्नी संगीता खाडे या प्रचारासाठी मैदानात उतरल्या आहेत. सध्या त्या वणी विधानसभा क्षेत्रातील वणी शहर व ग्रामीण भागात गावसभा घेत संजय खाडे यांच्या विजयासाठी आवाहन करीत आहे. यात त्यांना माजी आमदार विश्वास नांदेकर यांच्या पत्नी किरण नांदेकर तसेच महिलाशक्तीची साथ मिळाली आहे. 


संगीता खाडे या त्यांच्या सहकारी महिलांसह रोज प्रचार करीत आहे. कधी वणी शहर तर कधी ग्रामीण भागाचा त्यांचा दौरा असतो. जवळपास 25 जणांची त्यांची चूम आहे. त्यांच्या प्रचारात पदयात्रा, बैठका, कॉर्नरसभा तसेच गृहभेटींचा समावेश आहे. ही चमू घरोघरी जाऊन महिलांशी संवाद साधतात. त्यांच्या समस्या जाणून घेतात. महिला थेट भेटीला येत असल्याने गावकरी महिला देखील या चमुशी मुक्तपणे संवाद साधतात. 


आता पर्यत या महिलांच्या चमुनी संपूर्ण वणी शहर पिंजून काढले आहे. सध्या त्यांचा ग्रामीण भागातील दौरा सुरु आहे. आतापर्यंत नांदेपेरा, दहेगाव, वागदरा, लालगुडा इत्यादी गावांचा या चमुनी दौरा केला आहे. त्यांच्या प्रचाराला महिलांचा देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे ही बाब अतिशय चर्चेची ठरत आहे. प्रचार दौ-यात महिला सक्षमीकरण, आरोग्य, रोजगार, शिक्षण, स्वयंरोजगार इत्यादी महिलांच्या विषयांचा भर असतो. 


प्रचार दौ-यात कविता चटकी, सुनिता बोढे, किरण नांदेकर, उषा पेचे, वंदना भोंगळे, रुपाली खाडे, निता शिवरकर, सुनंदा शिवरकर, सविता सोनवणे, वर्षा खाडे, स्वाती निखाडे, प्रतिभा झाडे, सीमा आवारी, भाग्येश्री वैद्य, गंगुबाई बनसागर, लता रजपूत, निता पारशीवे, जया शिवरकर, सुनंदा खाडे, विजया आगबत्तलवार, आशा टोंगे, मंदा बांगरे, प्रमिला चौधरी, ज्योत्स्ना आचार्य, सुरेखा वडिचार यांच्यासह किरण नांदेकर यांच्या सहकारी यांचा समावेश आहे.  


मंगळवारी संजय खाडे यांचा लाठी-शिंदोला सर्कलमध्ये प्रचार

मंगळवारी दिनांक 12 नोव्हेंबर रोजी संजय खाडे यांनी शिरपूर-शिंदोला सर्कलमध्ये प्रचार दौरा झाला. या प्रचार दौ-यात त्यांनी मंदर, केसुर्ली, चारगाव, वारगाव, पुरड, पुनवट, नायगाव, सावंगी, चिंचोली, शिवनी, येनाडी, कोलगाव, साखरा, माथोली, कैलाशनगर या गावांचा दौरा केला. तर बुधवारी त्यांचा मार्डी सर्कलमध्ये प्रचार आहे. सकाळी वनोजा देवी पासून प्रचाराला सुरुवात होणार आहे. त्यानंतर गोरज, दांडगाव, आपटी, मुक्टा, हिवरा, कानडा, शिवणी धोबे, चनोडा, चोपण, कानडा येथील दौरा आहे. तर मार्डी येथे कॉर्नर सभेने प्रचाराची सांगता होणार आहे. तर संध्या. 5 वाजता झरी येथील बिरसा मुंडा चौकात कॉर्नर सभा आयोजित करण्यात आली आहे.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies