वणी :- प्रतीनिधी
महाविकास आघाडीचे शिवसेना (उबाठा) गटाचे उमेदवार संजय देरकर यांचं राजकीय व सामाजिक वलय बघता त्यांना पाठिंबा देणाऱ्यांचा कल वाढू लागला आहे. घटक पक्ष तथा सामाजिक व राजकीय संघटना त्यांना उत्स्फूर्तपणे पाठिंबा दर्शवू लागल्या आहेत. १३ नोव्हेंबरला कलाकार महासंघानेही त्यांना जाहीर पाठिंबा दर्शविला आहे. संजय देरकर यांना मानणारा व त्यांच्याशी जुळलेला एक मोठा वर्ग या मतदार संघात आहे. त्यांच्या कार्याने व त्यांना मिळालेल्या उमेदवारीने प्रभावित होऊन हा वर्ग आता त्यांना जाहीर पाठिंबा दर्शवू लागला आहे. वणी मतदार संघात संजय देरकर यांच्या समर्थकांची संख्या मोठी आहे. सर्वसामान्य कार्यकर्ता त्यांच्याशी निष्ठेने जुळला आहे. हाच समर्थक वर्ग व निष्ठावान कार्यकर्ता त्यांच्या विजयासाठी दिवसरात्र झटत आहे. वणी विधानसभा क्षेत्रात संजय देरकर यांचा दणकेबाज प्रचार सुरु आहे. काँग्रेसचे माजी आमदार वामनराव कासावार, जेष्ठ नेते देविदास काळे, टिकाराम कोंगरे, आशिष खुलसंगे, महेंद्र लोढा हे संजय देरकर यांच्या प्रचाराची कमान सांभाळून आहेत. गावागावात, घरोघरी, दारोदारी जाऊन संजय देरकर यांचा प्रचार करीत आहेत. तसेच राष्ट्रवादीचे नेते विजय नगराळे हे देखील प्रचंड मेहनत घेत आहेत. शिवसेनेच्या नेत्यांनी तर संजय देरकर यांच्या प्रचारात स्वतःला झोकून दिले आहे. शिवसेनेचे दीपक कोकास, संजय निखाडे, सुनिल कातकडे यांच्यासह प्रत्येक शिवसैनिक निष्ठेने संजय देरकर यांच्या प्रचाराची धुरा वाहतो आहे. त्यातल्या त्यात संजय देरकर यांच्या उमेदवारीला भक्कम पाठिंबा मिळू लागला आहे. अनेक संघटनांनी त्यांना उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिला आहे. यात भर पडतच असून आता कलाकार महासंघानेही संजय देरकर यांना जाहीर पाठिंबा दर्शविला आहे.