वणी विधानसभेत आमदार होण्यासाठी या निवडणुकीत अनेकजण गुडघ्याला बाशिंग बांधून तय्यार झाले आहे. मात्र यातील अनेक उमेदवारांना स्थानिक लोकांची जान नाही. आणि विशेष म्हणजे लोकहिताच्या प्रश्नांची त्यांना काही घेणेदेने नाही. केवळ मते मागायची व आमदार व्हायचे हा एकमेव उद्देश घेऊन बहुतांश उमेदवार निवडणूक लढवित आहे. परंतु या भाऊगर्दीत स्थानिक जनतेसाठी नेहमीच तळमळीने धावून येणारा राजु उंबरकर यांच्या बद्दल लोकं आशादायी आहे. त्यांच्या सतत लोकसंपर्काने येथील जनतेच्या मूलभूत प्रश्नांची जाण आहे. हे प्रश्न सोडविण्यासाठी ते बारा महिने चोवीस तास सक्रीय असते
सत्तेत नसतांनाही राजु उंबरकर इतक्या तळमळीने लोकांचे प्रश्न सोडवितो. केवळ लोकांशी लोकांप्रती आपली सहानुभूती आहे. असा दिखावा ते करीत नाही. या उलट त्यांचे प्रश्न ते आत्मीयतेने सोडवित असतो. त्यांच्या वेदनेवर मायेची फुंकर घालत असते. त्यामुळे राजु उंबरकर यांना एकदा तरी विधानसभेत पाठवायला हवे अशी चर्चा आता गावा शहरातील मतदार गांभीर्याने करीत आहे. यामुळे मागे संधी हुकलेला राजु उंबरकर यावेळेस मात्र प्रचारात सर्वात मोठी आघाडी घेवून आहे.