१३ नोव्हेंबरला महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देरकर यांच्या प्रचारार्थ शहरात रॅली काढण्यात आली होती दरम्यान रॅली शहरातील गांधी चौकातील मोठी कमान चौकात येताच सामाजिक कार्यकर्ते उमेश पोद्दार यांनी त्यांना आपला जाहीर पाठिंबा दर्शवित त्यांनी शिवसेना उबाठा गटात प्रवेश केला आहे. उमेश पोद्दार यांचा शहरात मोठ्या संख्येने मित्र परिवार आहे हे विशेष...
यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देरकर, कॉंग्रेस नेते वामनराव कासावार, उपजिल्हाप्रमुख अजिंक्य शेंडे, अखिल सातोरकर, डॉ महेंद्र सिंग लोढा, कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष ईजहार शेख यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.सामाजिक कार्यकर्ते उमेश पोद्दार यांनी पाठिंबा जाहीर केल्यानंतर त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जातो आहे.