Type Here to Get Search Results !

वंचित बहुजन आघाडी चे राजेन्द्र निमसटकर यांना प्रचारात जन सामान्यांचा वाढता प्रतिसाद


▪️
 अनोख्या प्रचाराने भाकरी फिरणार...जनतेत उत्साह

वणी विधानसभा निवडणुकीच्या मैदानात प्रचाराचा ज्वर चढला आहे. वणी विधानसभा मतदार संघामध्ये भाजप विरूद्ध शिवसेना ठाकरे गटात चुरशीचा सामना आहे, अशी प्रस्थापित पुढार्‍यांची धरणा असताना मात्र, वंचित बहुजन आघाडने प्रचारात मारलेली मुसंडी बघता हे चित्र बदलतांना दिसते आहे. प्रचाराच्या पहिल्या टप्यातचं वंचित बहुजन आघाड़ी चे उमेदवार राजेन्द्र निमसटकर यांनी प्रचारात आघाड़ी घेतल्याचं दिसत असून इतर उमेदवार प्रचाराची हायटेक यंत्रनेचा वापर करत असतांनाचं, राजेन्द्र निमसटकर मात्र पांरपारीक यंत्रणाचा उपयोग करत, विधानसभा क्षेत्रवार गावांना भेटी देत कॉनर सभा घेत मतदारांना बोलतं करीत आहे. 

आजतागायत इथल्या भांडवलवादी यंत्रणानी सामान्य लोकांच्या मताचा वापर करुण आपल्या सात पिढ्यांना पुरेल एवढी संपत्ति कमाउन ठेवली. मात्र, जनतेला दारिद्रयाच्या खाईत लोटलं. दिंवसेंदिवस जनता गरीब होतं चाललेली आहे. एकेकाळचा मध्यमवर्गीय, श्रीमंत असलेले कुटुंब आज गरीबीच्या लाइनीत येत आहेत. मागासवर्गीय जनतेला गुलाम करण्याचे षडयंत्र रचल्या जात आहे. गावखेड्यातील गरीबांची लेकर शिकत असलेल्या शाळा बंद केल्या जात आहेत. आश्रम शाळाची दुरावस्था होत आहे गरीबीचं प्रमाण वाढत आहे. आया बहिणी सुरक्षित नाही आहेत, अशा गेल्यां ७७ वर्षांत सत्तेतील आणी विरोधी पक्षांनी या देशातील राज्यातील जनतेचं वाटोळ केलं आहे. 

जर ही बिघडलेली परिस्थिति सुधारवायची असेंल तर वंचित बहुजन आघाड़ी चे उमेदवार राजेन्द्र निमसटकर यांना बहुमताने विजयी करा असे आवाहन गाव खेड्यातला सामान्य माणूसकरताना दिसतो आहे. सदर आवाहनास गावागावातील लोक मोठ्या प्रमाणात प्रतीसादही देत आहेत व स्वत:हुन गावसभांचे आयोजन करुण राजेन्द्र निमसटकर यांना आमंत्रित करीत आहेत. 

आता पर्यंत पक्षांनी भाकरी फिरवली नाही तेच तेच उमेदवार आमच्या डोक्यावर मारले ज्यांना जनतेने वांरवांर नाकारले त्यानांच अधिकृत पक्ष उमेदवारी देतो, या सर्वांचा आम्हास उबग आला आहे. आता आम्हीचं भाकरी फिरवतो व जनमाणसामध्ये राहुण कामं करणारा माणुस राजेन्द्र निमसटकर यांना भरघोष मतं देउ याची खेड्यापाड्यातील लोक ग्वाही देत आहेत, म्हणूनच वणी विधानसभा क्षेत्रात वंचित बहुजन आघाड़ीला यावेळी यश मिळेलचं याचे चिन्ह सध्या तरी निवडणुकीच्या धामधुमीत गाव खेड्यातील जनमानसाच्या बोलत्या प्रतिक्रिया मधून दिसते आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies