वणी :- आयटीआय करून गावाकडे जाणाऱ्या दुचाकीला विरुद्ध दिशेने येणाऱ्या अज्ञात वाहनाने जबर धडक दिल्याने दुचाकीस्वार राजकुमार दडांजे (वय 20) जागीच ठार झाल्याची घटना आज गुरुवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास नवरगाव गावाजवळ घडली.
राजकुमार दडांजे वय 20रा.उमरघाट ता. झरी जामणी हा वणी येथे आय टी आय ला आला होता, गुरुवारी आय टी आय करून नेहमीप्रमाणे दुचाकीने आपल्या गावाकडे निघाला होता. दरम्यान भरधाव येणाऱ्या अज्ञात वाहनाने उमरी - नवरगाव गावानजीक एका वळणावर दुचाकी क्र. एम एच 29-एपी, 7741 ला जबर धडक दिली. यात दुचाकीस्वार राजकुमार हा जागीच ठार झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले व घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वणीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.