मारेगाव :- काँग्रेस पक्ष हा सर्वसामान्य जनतेचा पक्ष असून वणी विधान सभा क्षेत्रात काँग्रेसचे नाव संपुष्टात आणन्याचे कटकारस्थान रचले जात असल्याने सर्वसामान्य जनतेसह तळागाळातील कार्यकर्त्यानी मला ही उमेदवारी दिली व मी दिलेल्या वचनाला बांधील राहण्याचे आश्वासन अपक्ष उमेदवार संजय खाडे यांनी ता. १४ नोव्हेंबर रोजी रात्री मारेगांव येथील काॅर्नर सभेत खाडे यांनी जेष्ठ नेते नरेंद्र पाटील ठाकरे, विधाते, पंचायत समिती माजी उपसभापती संजय आवारी, जनहित कल्याण सं.संस्थापक अध्यक्ष गौरीशंकर खुराणा, सुरेश पारखी, जयनारायण बदकी, जनहित कल्याण संघटनेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, तथा असंख्य हितचिंतक, काँग्रेस चे आजी माजी पदाधिकारी व असंख जनतेच्या उपस्थितीत खाडे यांनी विरोधकांचा खपूस समाचार घेतला.
विधान सभा निवडणुकीचा प्रचार अंतीम टप्प्यात असून आता प्रचाराचा जोर वाढला असून अपक्ष उमेदवार संजय रामचंद्र खाडे याचे प्रचार वादळ विरोधकांना धडकी भरवत आहे.ता. १४ नोव्हेंबर रोजी बोटोणी व परिसरात संजय खाडे यांच्या प्रचाराचा ताफा, डोअर टु डोअर प्रचार केल्यानंतर रात्री सात वाजता मारेगांव येथे हजारोच्या संख्येत पोहचला. त्यावेळी संजय खाडे यांनी मार्डी चौकात झालेल्या काॅर्नर सभेत खाडे यानी विरोधकांचा समाचार घेतला.
काॅर्नर सभेत बोलतांना खाडे म्हणाले मागील २५ वर्षापासुन काँग्रेसचा कट्टर कार्यकर्ता असून दुसऱ्या पक्षाचा विचार सुध्दा केला नसून वणी विधान सभा क्षेत्र हे काँग्रेसचा पूर्वीपासून बालेकिल्ला असतांना काँग्रेसचा उमेदवार दिला नाही. म्हणून ही या वणी विधान सभा क्षेत्रातील सर्वसामान्य जनता, कार्यकर्ते यांचा आत्मसन्मान व काँग्रेसच्या हिताची लढाई असल्याचे मनोगत व्यक्त करत करत, शेतकरी शेतमजुर,बेरोजगार व शेतीपुरक व्यवसाय यासाठी कट्टीबध्द असून न्याय हक्कासाठी झटत राहणार असल्याचे वचन दिले.