वणी:- वणी विधानसभा क्षेत्रात निवडणूक चुरशीची होते असल्याचे दिसून येते असताना अनेक संघटना उमेदवारांना पाठिंबा जाहीर करीत आहे.१४ नोव्हेंबर रोजी मारेगाव येथील बिरसा ब्रिगेड, अखिल भारतीय विकास परीषद व जन-संग्राम पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार यांना पाठिंबा देवून संपूर्ण समाज भाजपाच्या पाठीशी उभे राहिल असे आश्वासन देऊन तसे पत्र सुध्दा देण्यात आले.
वणी विधानसभा क्षेत्रातील दोन्ही ही उमेदवारा कडील काही राजकीय पुढारी आवाहन करीत आहेत की, आदिवासी समाज बांधव आमच्या पाठीशी आहे.अशी अफवा पसरवीत आहे.आदिवासीच्या नावावर उभे असलेल्या उमेदवारां कडून मलिंदा वसुल करीत असल्याचे निदर्शनास आल्याने तिनही संघटनांनी बैठक घेऊन भाजपचे उमेदवार संजिवरेड्डी बोदकुरवार यांना पाठिंबा जाहीर केल्याचे पत्रकात नमूद केले आहे.
अखिल भारतीय विकास परिषदेचे तालुका अध्यक्ष व नगरसेवक अनिल गेडाम,बिरसा ब्रिगेड मारेगाव चे तालुका अध्यक्ष शेषराव मडावी,व आदिवासी जन-संग्राम संघटनेचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष श्रीधर सिडाम यांनी ऐक मतांनी निर्णय घेत भाजप पक्षाचे अधिकृत उमेदवार संजिवरेड्डी बोदकुरवार यांना विजयी करण्याचा संकल्प केला.