वणी :- प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार राजु उंबरकर यांना विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना आपला जाहीर पाठिंबा दर्शवित आहे. हे समाज मनसे सोबत निवडणुकीत सहभागी होत असून राजू उंबरकर यांच्या विजयासाठी प्रयत्न करीत आहे. वणी विधानसभा मतदारसंघातील मातंग समाजाच्या वरिष्ठ मंडळींनी मंगळवारी उंबरकर यांची भेट घेऊन मातंग समाज त्यांच्या पाठीशी असल्याची स्विकारोक्ती दिली.वणी येथील स्थानिक मनसे कार्यालयात हरीश पोटफोडे, शैलेंद्र खडसे, नरेश ससाने, महादेवराव जाधव, सागर डोंगरे, रमण खडसे, अशोक पोटफोडे, सचिन शेंडे, केतन तायवडे, आकाश पोटफोडे, रमेश बावणे, विनयकुमार उकुंडे, रमेश राऊत, अनिकेत वानखेडे यांच्या सह मातंग समाज बांधवांनी राजू उंबरकर यांची भेट घेऊन आपला पाठींबा दर्शविला. मातंग समाजाच्या पाठिंब्याने विधासभेत मनसेचा बळ आणखी मजबूत झाला आहे.