शासनाच्या वतीने नाफेड मार्फत सोयाबीनची खरेदी सुरु झाली आहे. मात्र वणी येथे नाफेडने सोयाबीन खरेदी करतांना शेतकऱ्यांना चांगलेच वेठीस आणले. सोयाबीनची आद्रता जास्त दाखवून सोयाबीन खरेदी करण्यास नाफेड कडून नकार देण्यात येत असल्याने शेतकरी कमालीचे काळजीत आले. नाफेड आद्रतेचे कारण पुढे करून शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांकडे जाण्याचा मार्ग दाखवीत असल्याने शेतकरी चांगलेच विवंचनेत आले. शेवटी हा प्रकार शेतकऱ्यांनी मनसे नेते राजू उंबरकर यांच्याकडे कथन केला. राजू उंबरकर यांनी तात्काळ फाल्गुन गोहोकार यांना नाफेडच्या खरेदी केंद्रावर पाठविले. फाल्गुन गोहोकार यांनी नाफेडच्या कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. आणि शतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी करण्यास भाग पाडले. मनसेने हिसका दाखविताच नाफेडने कोणताही अडथळा न आणता नियमानुसार सोयाबीन खरेदी सुरु केल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर पेटून उठणाऱ्या राजू उंबरकर यांना नाफेड शेतकऱ्यांवर अन्याय करीत असल्याचे कळताच राजू उंबरकर यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. शेतात घाम गाळून पिकविलेल्या सोयाबीनची आद्रता जास्त दाखवून सोयाबीन खरेदी करण्यास नकार देणाऱ्या नाफेडवर तीव्र संताप व्यक्त करीत राजू उंबरकर यांनी मनसेचे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांना प्रचार सोडून नाफेडच्या खरेदी केंद्रावर पाठविले. शेतकऱ्यांच्या सोयाबीनमध्ये गुणदोष दाखवून सोयाबीन खरेदी करण्यास नकार देणाऱ्या नाफेडला फाल्गुन गोहोकार यांनी चांगलेच धारेवर धरले. नाफेडला मनसे स्टाईल हिसका दाखविताच नाफेड वठणीवर आली. आणि त्यांनी शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी करण्यास सुरुवात केली. सोयाबीनची आद्रता जास्त दाखवून सोयाबीन व्यापाऱ्यांना विकण्यास भाग पडणाऱ्या नाफेडचा मनसेने खरपुच समाचार घेतला. मनसेच्या हिसक्याने नाफेड मार्फत शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी सुरु झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.