वणी :- निवडणुकीच्या धामधुमीत राज्यात सर्वत्र प्रचाराचा धडाका सुरु असतांना यवतमाळ जिल्ह्यातील वणी विधानसभा मतदार संघात उल्लेखनीय प्रचार करीत वंचित बहुजन आघाडी चे उमेदवार राजेंद्र निमसटकर यांना प्रचारा दरम्यान मिळत असलेला प्रतीसाद पाहता आणी गांव खेड्यातील मतदारामध्ये असलेली त्यांची जवळीक बघता, इतरांचे गणीत बिघडवीत मतदार संघात ते किंग ठरतील असे दिसत आहे.
इतर उमेदवार भव्य प्रचार व गाड्यांचा ताफा घेउन फिरत असतांना राजेन्द्र निमसटकर हे मात्र, मतदारांची प्रत्यक्ष भेट घेत, युवक मंडळाच्या महिला बचत गट यांच्याशी प्रत्यक्ष भेटुन संवाद साधत आपला प्रचार करीत आहेत. या दरम्यान गावागावात त्यांना मोठा प्रतीसाद मिळत असल्याचे चित्र सर्वत्र वणी विधानसभा मतदार संघात दिसुन येत आहे.
एकूणच निवडणुकीची रणधुमाळी शेवटच्या टप्प्यात आली असतांना वणी विधानसभा मतदारसंघातील मतदारांमध्ये शहरापासुन तर गाव खेड्यापर्यतचे दिसत असलेले राजकीय चित्र वंचित बहुजन आघाडीचे राजेंद्र निमसटकर हेच खरे तर किंग ठरतील असे सार्वत्रिक चित्र दिसत आहे.