वणी'- १७ नोव्हेंबर २०२४ दुपारी १ ते ५ वाजे पर्यंत वणी विधानसभा निवडणूक प्रचारार्थ भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. होवु घातलेल्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजय देरकर यांच्या प्रचारार्थ भव्य शक्तिप्रदर्शन करीत पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने काँग्रेस पक्षाचे माजी आमदार वामनराव कासावार, टिकाराम कोंगरे, आशिष खुलसंगे, मोरेश्वर पावडे,ॲड, देवीदास काळे, डॉ.महेंद्र लोढा,अरुणा खंडाळकर, मारोती गौरकार, राजु येलट्टीवार, घनश्याम पावडे, मंगल मडावी, राकेश खुराणा, ओम ठाकूर, शालिनी रासेकर, शामा तोटावार, संध्या बोबडे या जनाधार असलेल्या नेत्यांनी सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांना मार्गदर्शक सुचना देत उद्याच्या पदयात्रेत कार्यकर्त्यांसह उपस्थित राहण्याचे आवाहन केले.
शिवसेनेच्या वतीने संजय निखाडे, दीपक कोकास, सुनिल कातकडे, संतोष माहुरे, शरद ठाकरे, रवी बोढेकर, योगिता मोहोड, डिमन टोंगे, वनिता काळे, गीता उपरे, राजु तुरणकर, प्रकाश कऱ्हाड, अनिल राजूरकर, मधुकर वरडकर,राष्ट्रवादीचे विजय नगराळे, आबिद हुसेन, सूर्यकांत खाडे, दिलिप भोयर, समाजवादी चे रज्जाक पठाण, कॉम्रेड पक्षाचे दिलिप परचाके, कुमार मोहरंपुरी, प्रविण आत्राम, अजय धोबे सह सर्व मोठ्या संख्येने या पदयात्रेत सामील होऊन परिवर्तनाचा आवाज बुलंद करण्याचे आवाहन केले आहे.