वणी विधानसभा मतदरसंघातील झरी तालुक्यातील कोसारा, सिंधिवाढोना, दरा, बाळापुर, बोपापुर, चींचघाट, अडकोली, पांढरकवडा (लहान), झरी, शिबला, हिवराबरसा, माथार्जुन येथे महायुतीचे अधिकृत उमेदवार मा.संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी प्रचारार्थ गावोगावी भेटी दिल्या असून मतदारांना येत्या विधानसभा निवडणुकीत भरगच्च मतांनी कमळ या बोधचिन्ह वरील बटण दाबून विजयी करा . असे आव्हान करून त्यांच्या कामाची पावती प्रचारादरम्यान सांगितली. सदर झरी तालुक्यात मतदारांकडून प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहेत. आदिवासी बांधवां सोबत भेटी घेण्यात आलेले आहे. झरी येथे मोठ्या प्रमाणात रॅली आयोजन केले असता यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. सदर यावेळेस
भाजपा तालुकाध्यक्ष झरी सतीश नाकले, ख.वी.अध्यक्ष मुन्ना बोलेरवार, शिवसेना शिंदे गट मोरेश्वर सरोदे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर चिकटे, माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश मानकर, माजी पं. स. सभापती राजेश्वर गोंड्रावर, भाजपा जेष्ठ नेते अशोक बोदकुरवार, बच्चू चिडे, नाना सुगंधे, लताताई अत्राम, संजय दातारकर, अनिल पोटे, अनिल विधाते व महायुती पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.