सत्तेवर नसताना राजू उंबरकर यांनी मतदार संघातील तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे, गोर गरीब शेतकऱ्यांच्या मुलींचे शिक्षण व लग्न करुन देणे, अल्प भूधारक शेतकऱ्यानं मोफत बी बियाणे वाटपसह पीक विमा, शेतकऱ्यानं 24 तास वीज पुरवठा, कापसाला योग्य भाव अश्या अनेक मुद्द्यांवर आंदोलने केली. वेळप्रसंगी त्यांनी कारावास भोगावा लागला. केलेल्या कामावरून राजू उंबरकर यांची ओळख कामाचा माणूस म्हणून सगळीकडे झाली.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी वणी मतदार संघातून राजू उंबरकर यांची उमेदवारी जाहीर करताच मनसे कार्यकर्ता कामाला लागले होते. गावागावात पायदळ फिरुन प्रचार करताना राजू उंबरकर यांना अनेक वृध्द महिला भरभरून आशीर्वाद देत आहे. तर तरुण व युवक मंडळी रात्री उशिरा पर्यंत प्रचार कामात व्यस्त आहे. मागील तीन चार दिवसांपासून झरीजामणी तालुक्यातील गावात प्रचार दौऱ्यात असताना मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग मनसेकडे आकर्षित झाल्याचे जाणवले. राजु उंबरकर यांच्या प्रचारासाठी तयार करण्यात आलेला ‘आता आमदार होणार कामाचा माणूस…राजू उंबरकर’ हा प्रचार गीत मतदारांना खूपच आवडत आहे.