▪️ रॅलीमध्ये हजारो लोकांचा सहभाग, झरी तालुक्यातही वाजणार शिट्टी
▪️ गोंडवाना संग्राम पक्षाचा संजय खाडे यांना पाठिंबा
वणी:- प्रतिनिधी
शुक्रवारी दिनांक 8 नोव्हेंबर रोजी अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या मुकुटबन येथील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन झाले. प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनानंतर मुकुटबनमध्ये भव्य रॅली काढण्यात आली. रॅलीत मुकुटबन व झरी तालुक्यातील हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी शिट्टीच्या आवाजाने संपूर्ण मुकुटबन गाव निनादून गेले. यावेळी माजी आमदार विश्वास नांदेकर, नरेंद्र ठाकरे, चंद्रकांत घुगुल यांच्यासह झरी तालुक्यातील शिवसैनिक व काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाच्या वेळी विश्वास नांदेकर म्हणाले की मी कडवट शिवसैनिक आहे. गेल्या 30 वर्षांपासून शिवसैनिक म्हणून काम करीत आहे. अनेक वर्षांपासून राबणा-या शिवसैनिकाऐवजी गेल्या चार महिन्यात सक्रिय होणा-या उमेदवाराला तिकीट देऊन निष्ठावंत शिवसैनिकावर अन्याय होत आहे. त्यामुळे मी संजय खाडे यांच्या पाठिशी उभे राहण्याच्या निर्णय घेतला आहे. या लढाईत निष्ठावंत शिवसैनिक माझ्या सोबत आहे.
नरेंद्र ठाकरे म्हणाले की गेल्या 62 वर्षांच्या काळात पहिल्यांदाच काँग्रेसची दयनीय अवस्था झाली आहे. लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला वणी विधानसभेतून 57 हजारांची लीड असतानाही ही जागा उबाठाला गेली. हा काँग्रेसच्या प्रामाणिक कार्याकत्यांवर अन्याय आहे. संजय खाडे हे धडाडीचे व सर्वसामान्य कुटुंबातून येणारे कार्यकर्ते आहे. त्यांच्या कार्यामुळे मी त्यांना पाठिंबा दिला आहे. त्यांच्या या लढाईत काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता सोबत आहे.
कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी प्रसाद ठाकरे, प्रवीण बद्दमवार, समाधान कुनाटकर, निलेश बेलेकर, वासुदेव देठे, बंडू देवाळकर, चेतन बारशेट्टीवार, प्रणिता घुगुल, सुरेखा भोयर, किरण नांदेकर, खडकीचे सरपंच सौ. लोढे, अतुल निखाडे, प्रमोद डवरे, विठ्ठल पोटे, अरुण येनगंटीवार, उमेश चुक्कलवार, राहुल जलेलवार, महेश सिद्धमवार,जगदीश बोर्डावार इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती.
मुकुटबन येथील रॅलीनंतर प्रचाराचा ताफा प्रचार रुईकोट मार्गे अर्धवन येथे गेले. अर्धवन येथे कॉर्नर सभा झाली. त्यानंतर प्रचार ताफा मार्की येथे गेला. तिथे पदयात्रा निघाली. या पदयात्रेला गाक-यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यानंतर प्रचार ताफा झरी येथे पोहोचला. झरी येथे बिरसा मुंडा चौकात संजय खाडे यांनी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर प्रचाराला सुरुवात झाली. यावेळी प्रचारात आम आदमी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते संजय खाडे यांच्या प्रचारात सहभागी झाले. त्यांनी संपूर्ण झरी तालुक्यात आपचे कार्यकर्ते पाठिशी राहणार असे वचन दिले.
गोंडवाना संग्राम पक्षाचा संजय खाडे यांना पाठिंबा
गोंडवाना संग्राम पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. निरंजन मसराम यांनी पत्र लिहून संजय खाडे यांना आपला पाठिंबा जाहीर केला. धडाडीचे नेते, लोकांच्या समस्येची जाण असलेले लोक विधानसभेला जायला पाहिजे, हा दृष्टीकोन लक्षात घेऊन त्यांनी आपला पाठिंबा संजय खाडे यांना जाहीर केला. गोंडवाना संग्राम पार्टीचे नेते बंडू सिडाम यांनी वणीतील प्रचार कार्यालयात सदिच्छा भेट देत पाठिंब्याचे पत्र संजय खाडे यांना सुपुर्द केले. यावेळी बंडू सिडाम यांनी पक्षाचे वणी विधानसभेतील सर्व कार्यकर्ते व नेते संजय खाडे यांचा प्रचार करणार असे वचन दिले.