♦ संधीचं सोनं करून मतदार संघ राज्यात अव्वल करणार
वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या हाताला काम नाही, महागाईमुळे माता भगिनी त्रस्त झाल्या आहे. येथील खनिज संपदा लुटल्या जात आहे. विकासाच्या नावावर कमिशनखोरीचे धंदे सुरू झाले आहे. लोकप्रतिनिधी सत्तेच्या नशेत झिंगून आहेत. सर्व सामान्य नागरिकांची समस्या ऐकायला कुणीही तयार नाही. अशातच जनतेसमोर मनसे हा चांगला पर्याय आहे. या निवडणुकीत मनसेला साथ द्या.. विकास काय असते हा येत्या पाच वर्षात जनतेला उघड्या डोळ्यांनी दिसेल. असे आवाहन मनसे उमेदवार राजू उंबरकर यांनी शिरपूर, शिंदोला विभागात आपल्या प्रचार दौऱ्यात मतदारांना केला.
मनसे उमेदवार राजू उंबरकर यांनी सुरुवात पासून प्रचारात आघाडी घेतली आहे. तरुण मतदारांसोबतच महिला वर्गही उंबरकर यांच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद देत आहे. प्रचारासाठी मनसेने कार्यकर्त्यांची एक फौज उभी केली आहे. अतिशय नियोजनबद्द प्रचार सुरु असल्याने मनसे विधानसभा क्षेत्रात शर्यतीत पुढे आहे. वणी विधानसभा मतदार संघातील नागरिकांनी काँग्रेस, शिवसेना, भाजप या सर्व पक्षातील उमेदवारांना निवडून देऊन त्याचे परिणाम सुद्धा भोगले आणि भोगत आहे. मात्र यावेळी कामाचा माणूस असलेल्या राजू उंबरकर याला एक वेळ संधी द्या. या संधीच सोन करुन मतदारसंघ राज्यात अव्वल करेल असे मत राजू उंबरकर यांनी मतदारांना केलं.