Type Here to Get Search Results !

आमदार झाल्यास सर्व प्रथम २० हजार युवकास रोजगार उपलब्ध करुन देईल- राजु उंबरकर




मारेगाव : - मतदारसंघात अनेक कोळसा खानी आणि विविध कंपन्या असून सुद्धा येथील युवक बेरोजगारच आहे. त्यामुळे मी निवडून आल्यानंतर सर्वप्रथम मतदारसंघातील २० हजार युवकांच्या हाताला काम मिळवून देत त्यांना रोजगार उपलब्ध करून देणार असल्याची शाश्वती मनसेचे उमेदवार राजू उंबरकर यांनी दिली.

वणी आणि परिसरात विपुल खनिज संपत्ती आहे. ज्यात दगडी कोळसा, डोलामाईट, लाईमस्टोन मिळतो. तर याच आधारे काम करणाऱ्या अनेक कंपन्या सुध्दा या भागात कार्यरत आहे. तर अलीकडे बिरला उद्योग समूहाची सिमेंट कंपनी सुध्दा मुकुटबन येथे स्थापन झाली. रोजगाराच्या दृष्टीने एवढी उपलब्धी असताना सुद्धा येथील युवकाच्या हाताला काम नाहीं तो पूर्णपने बेरोजगार आहे. या बेरोजगारीपायी अनेकदा नैराश्य आणि नैराश्यातून जीवन संपविण्याच्या घटना घडल्या. उच्च शिक्षित असून त्यांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध होत नसल्याने अनेक युवक पुणे – मुंबई सारख्या महानगराची वाट धरतात. या सर्वांवर तोडगा काढण्याच्या दृष्टीने मागील वर्षी मनसेचे नेते राजू उंबरकर यांच्या संकल्पनेतून रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. ज्यात ६,७०० युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. आता हीच शृंखला पुढें चालवत विधानसभेतील यशा नंतर २० हजार युवकाच्या हाताला काम देणार असल्याची घोषणा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार राजू उंबरकर यांनी केली.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies