वरोरा मार्गावरील नायगाव शिवारात शनिवारी सायंकाळी एका दुर्दैवी अपघातात 65 वर्षीय वृद्ध महिलेचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातात भरधाव अज्ञात वाहनाने वृद्ध महिलेच्या जीवावर बेतले.
मृत महिलेची ओळख ताराबाई लाटारी जोगी (वय 65), राहणार नेरड पुरड, अशी पटली आहे. त्या रोजंदारीवर काम करत होत्या. त्या काल शनिवारी शेतीचे काम आटोपून अन्य महिलांसोबत ऑटोने महामार्गावरील नायगाव फाट्याजवळ उतरल्या होत्या. महिलांनी रस्ता ओलांडण्यास सुरुवात केली होती. इतर महिला रस्ता पार करण्यात यशस्वी झाल्या; मात्र ताराबाई रस्ता ओलांडत असताना अचानक एका भरधाव वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. धडक एवढी जबरदस्त होती की ताराबाईंचा जागीच मृत्यू झाला.
घटनेनंतर परिसरात बघ्यांची मोठी गर्दी जमली. प्रत्यक्षदर्शींनी त्वरीत पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला.