वणी : शिवसेना (उबाठा) व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजय देरकर यांच्या प्रचारार्थ गुरुवार दिनांक 14 नोव्हेंबर रोजी वणी येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.हि सभा वसंत जिनिंग लॉन येथे संध्याकाळी 6.30 वा. होणार आहे. माजी आमदार वामनराव कासावार यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा होत आहे. सभेला विदर्भातील सुप्रसिद्ध वक्ते व ज्येष्ठ संपादक बाळासाहेब कुळकर्णी, शिक्षक आमदार सुधाकर अडबाले, आ. अभिजित वंजारी, अरविंद देशमुख प्रांतीय अध्यक्ष विमाशी संघ, यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेना व महाविकास आघाडीतर्फे करण्यात आले आहे.